MPSC परीक्षेसंदर्भात पुण्यात झालेल्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांसह 9 जणांना अटक तर 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
तर 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारने एमपीएससीची (MPSC Exam) परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती मिळताच पुण्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी (11 मार्च) रस्त्यांवर आंदोलन केले. यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी देखील पुढाकार घेतला होता. या आंदोलकांनी आठ तास रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर पोलिसांनी धरपकड कारवाई करत या कारवाईत गोपीचंद पडळकरांसह 9 जणांना अटक केली आहे. तर 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी एमपीएससी परीक्षेच्या तारखा घोषित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 14 मार्चला ही परीक्षा होणार होती. मात्र काल ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड गोंधळले. मात्र ही परीक्षा आठवड्याभरातच होणार असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.हेदेखील वाचा- MPSC New Exam Date: एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला होणार, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर
दरम्यान लोकसेवा आयोगाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे. MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसेवा आयोगाने सा-या गोष्टीचा साराचार विचार करता 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
काल पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत निर्दशने केली. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी परीक्षा वेळेत घेण्याची मागणी उचलून धरली. या सगळ्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आणि परीक्षा आठ दिवसांतच होईल, असे वचन दिले.