Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 8,308 नवे कोरोना रुग्ण, तर 258 जणांचा मृत्यू; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,92,589 वर पोहचली
भारतालादेखील कोरोना विषाणूच्या घट्ट विळखा घातला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) आज 8 हजार 308 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 92 हजार 589 इतकी झाली आहे.
Coronavirus Cases In Maharashtra: चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातले आहेत. भारतालादेखील कोरोना विषाणूच्या घट्ट विळखा घातला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) आज 8 हजार 308 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 92 हजार 589 इतकी झाली आहे.
राज्यातील 1 लाख 60 हजार 357 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय सध्या राज्यात 1 लाख 20 हजार 480 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 11 हजार 452 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे. (हेही वाचा - धक्कादायक! नवी मुंबईमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार)
दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांनी 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात मागील 24 तासांत 34 हजार 956 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 03 हजार 832 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत 25 हजार 602 जणांची कोरोना विरूद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रशासनाची चिंता वाढवत आहे.