Jalgaon Food Poisoning: पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा; जळगावच्या चोपडा तालुक्यातील घटना

विषबाधा झालेल्यांमध्ये मोठ्यांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Photo Credit -X

Jalgaon Food Poisoning: जळगावमध्ये 80 हून अधिक जणांना पाणीपुरी (Pani Puri)खाल्ल्याने विषबाधा(Poison) झाली आहे. या घटनेत बाधितांमध्ये मोठ्यांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्वांची प्रकृती स्थार आहे. त्यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. कमळगाव येथे सोमवारी आठवडी बाजारात सर्वांनी पाणीपुरी खाल्ली होती. काही जणांनी तेथेच पाणीपुरी विक्रेत्याकडून पाणीपुरी खाल्ली. तर, काहींनी तिथ न खाता घरी पार्सल नेली. (हेही वाचा:Food Poisoning in Nanded: नांदेड मध्ये प्रसादामधून विषबाधा; 100 जणांना उलट्यांचा त्रास )

पाणीपुरी खाल्ल्यानंतर संध्याकाळी नागरिकांना मळमळ, उलटी सारखे त्रास होऊ लागले. काहींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. त्यानंतर संध्याकाळी रुग्णांची संख्या वाढतच गेली. विषबाधा झालेल्यांमध्ये कमळगाव, चांदसणी, मितावली, पिंप्रीसह आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांचा समावेश आहे. (हेही वाचा: Nagpur Food Poisoning : अंडा बिर्याणी खाल्ल्याने यशवंतपूर एक्स्प्रेसमधील 40 प्रवाशांना विषबाधा; पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास)

दरम्यान, जवळपास 80 हून अधिक लोकांना विषबाधा झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोपडा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. बाधीतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.