Corona Update In Maharashtra Today: महाराष्ट्रात एकूण 12 हजार 296 लोकांना कोरोना विषाणूची लागण; राज्यात आज 790 नव्या रुग्णांची नोंद तर, 36 जणांचा मृत्यू

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले आहेत. महाराष्ट्रात आज 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 790 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येने 12 हजार 296 चा आकडा गाठला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत 37 हजार 776 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजार 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे शहरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. मुंबईत आज 547 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 172 वर पोहचली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 704 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- COVID19: धारावीत आज 38 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; आतापर्यंत 496 जणांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राची आकडेवारी-

मुंबईची आकडेवारी-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.