7/12 Utara | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सातबारा उतारा ( 7/12 Utara) हा कोणत्याही शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र. सातबारा उतारा (Satbara Utara) मिळविण्यासाठी तलाठी कार्यालय (Talathi Office) आणि त्यासाठी तलाठ्याकडे माराव्या लागणाऱ्या चकरा नव्या नाहीत. पण आता या चकरा मारण्याची आजीबात आवश्यकता नाही. आपण जगाच्या कोणत्याही टोकावरुन घरबसल्या आपल्या जमीनीचा ऑनलाईन सातबारा (7/12 Online) उतारा मिळवू शकतो. पाहू शकतो. होय, राज्याच्या महसूल विभागाने (Revenue Department) ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. महसूल दिनापासून (1 ऑगस्ट 2021) सामान्य जनतेसाठी महसूल विभागाने ही सुविधा उपलब्ध करन दिली आहे.

कसा पाहाल ऑनलाईन सातबारा

  • डिझिटल सातबारा ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला एक स्मर्टफोन किंवा संगणक, लॅपटॉप यापैकी एक गॅझेट वापरावे लागेल.

    स्मर्टफोन किंवा संगणक, लॅपटॉप या गॅझेटच्या माध्यमातून आपल्याला गुलगलच्या मध्यमातून bhulekh.mahabhumi.gov.in सर्च करणे आवश्यक आहे.

  • bhulekh.mahabhumi.gov.in ही महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट आहे. (हेही वाचा, सर्वसामान्यांना दिलासा! राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार: 7/12 मध्ये होणार 12 प्रकारचे बदल; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती)
  • ही वेबसाईट ओपन झाल्यावर स्क्रिनच्या उजव्या बाजूला आपल्याला Digitally Signed 7/12 किंवा 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी 'क्लिक करा' या पर्यायावर क्लिक करा. इथे 'आपला 7/12' असे नवे पेज ओपन होईल.
  • डिजिटल सातबारा पाहण्यासाठी आपल्याला आगोदर वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. जर तुम्ही ती आगोदरच केली असेल तर लॉग-इन आयडी पासवर्ड वापरुन तुम्ही तुमचा 7/12 पाहू शकता.

पहिल्यांदाच सातबारा काढण्यासाठी काय कराल?

जर तुम्ही पहिल्यांदाच सातबारा काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आश्यक आहे. तो वापरुन तुम्ही तुमचा डिजिटल 7/12 काढू शकता. त्यासाठी OTP Based Login पर्याय निवडा. त्यावर क्लिक करा.मग Enter Mobile Number या रखान्यात तुमचा मोबाईल क्रमांक टाका. आता तुम्हाला Send OTP पर्याय दिसेल. OTP sent on your mobile

पर्यायावर क्लिक करा. तुमच्या मोबाईल क्रमांकावर OTP आला असेल. हा ओटीपी म्हणजे काही आकडे असतात फक्त खात्रीसाठी. ते Enter OTP या रखान्यात भरा. आता Verify OTP पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसू लागतील. या पर्यायातून Digitally signed 7/12 हा पर्याय निवडा. आता 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा' आसा पर्याय दिसताच त्यावर क्लिक करा. तुम्हाला आवश्यक असलेले पेज दिसेल. या पेजवर तुम्हाला "Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance." अशी एक सूचना दिसेल. ही सूचना म्हणजे डिजिटल सातबारा मिळविण्यासाठी तुम्हाला 15 रुपये शुल्क ऑनलाईन द्यावे लागेल. ते पैसे तुमच्या बॅलन्समधून कापले जातील. तुमचे खाते नवे असल्यामुळे खात्यावर काहीच शिल्लख नसते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करुन खात्यावर पैसे भरा. मग सातबाबरा डाऊनलोड करा. हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम App द्वारे भरु शकता.