Coronavirus Update: महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात गेल्या दोन दिवसात 700 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात गेल्या दोन दिवसांत 700 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत 700 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सोमवारी 350 तर, मंगळवारी 354 रुग्णांनी कोरोनावर मात करुन आपपल्या घरी परतले आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात सलग 2 दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे राज्यात एकूण 2 हजार 899 जण कोरोनामुक्त झाले आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मुंबई मंडळात गेल्या दोन दिवसात सर्वाधिक 460 रुग्ण घरी गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे मंडळातही 213 रुग्णांना बरे करून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Corona Update In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; राज्यात आज 1 हजार 233 लोकांना लागण तर, 34 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

भारतात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.