Murder In Pune: पिंपरी-चिंचवड येथे प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाचा खून; एकाच कुटुंबातील 6 जणांना अटक

प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तुरुणाची निघृण हत्या (Murder Case) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तुरुणाची निघृण हत्या (Murder Case)  केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात सोमवारी रात्री 10 च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी प्रकरणी सागवी पोलिसांनी (Sangvi police station) एकाच कुटुंबातील 6 जणांना अटक केली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज जगताप असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विराज हा आपल्या मुलीवर प्रेम करतो, हे आरोपींच्या लक्षात आले. या प्रकरणातून मुलीच्या वडीलांनी आणि कुटुंबियातील इतर 5 जणांसोबत मिळून त्याला बेदम मारहाण केली. यामुळे विराज जागेवर बेशुद्ध पडला. विराज बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी बेशुद्ध अवस्थेत विराजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेमंत काटे, सागर काटे, जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. मयत विराज जगताप हा आरोपी जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम करत होता. विराज आपल्या मुलीवर प्रेम करतो ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर सर्व आरोपींनी 7 जून रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास विराजवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून जाणाऱ्या विराजचा आरोपींनी टेम्पोतून पाठलाग करून पिंपळेसौदागर येथील शिव बेकरीजवळ त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर आरोपींनी दगड आणि लोखंडी रॉडने विराजवर हल्ला केला. ज्यामुले विराज याचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- बीड: परळीत खदानीतील पाण्यात बुडून 3 बहीण भावंडांचा मृत्यू

याप्रकरणी मृत विराज जगतापच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर भादवी कलम 302/143,147,148, 149 सह अनुजाती जमाती कायदा कलम 3 (1) (आर), (एस) 3 (2) ()3 (2) (व्ही) 6 मपो.अधि. 1951 चे कलम 37 (1) 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.