मुंबई: धारावी मध्ये 6 नवे COVID-19 बाधित, या परिसरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 55 वर
ही संख्या धक्कादायक असून हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून Containment Zone म्हणून घोषित केलेल्या धारावी परिसरात झपाट्याने कोरोना चे रुग्ण वाढत चालले आहेत. यात धारावी परिसरात कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 55 वर पोहोचली असून एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. ही संख्या धक्कादायक असून हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात 352 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आणि 11 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सकारात्मक घटनांची संख्या 2334 वर पोहचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली. COVID19: आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Containment Zone म्हणून घोषित
पाहा ट्विट:
भारतात आज कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच यात 1211 नवीन रुग्णांचा समावेश असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.