Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 6 राज्यमंत्री; पहा संपूर्ण यादी
तर शिवसेनेचे आशिष जैस्वाल, योगेश कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंद्रनील नाईक यांनी देखील राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Maharashtra Cabinet Expansion: नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज पार पडला. येथे नव्या सरकारच्या 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी आमदारांना अडीच वर्षांसाठीच मंत्री करण्यात आलं आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा हा नवा फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये अडीच वर्षांनी पुन्हा मंत्री बदलले जाऊ शकतात. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपला 19 तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रीपद देण्यात आली आहेत. यामध्ये 6 आमदारांना राज्यमंत्री (Maharashtra Ministers of State) पदाची शपथ देण्यात आली आहे. भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, पंकज भोयर, माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे आशिष जैस्वाल, योगेश कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंद्रनील नाईक यांनी देखील राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (हेही वाचा -Narhari Zirwal Take Oath as Cabinet Minister: बिगारीचे कामगार, नंतर आमदार आणि आता थेट मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी नरहरी झिरवाळांची वर्णी)
महायुती सरकारमधील राज्यमंत्र्यांची नावे -
- माधुरी मिसाळ
- मेघना बोर्डीकर
- पंकज भोईर
- आशिष जयस्वाल
- योगेश कदम
- इंद्रनील नाईक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 39 मंत्री असणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 आणि शिवसेना शिंदे गटाने 57 जागांवर आपलं गड राखला. महायुती सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने सध्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.