IPL Auction 2025 Live

चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 55 पोलिसांना COVID-19 ची लागण, एकूण संख्या 1328 वर

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 1328 महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित असल्याचे आढळले आहेत.

Maharashtra Police | (PTI photo)

महाराष्ट्रात कोरोनाचे काळे सावट दूर करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसारखे कोविड योद्धा (COVID Warriors) दिवसरात्र रस्त्यांवर , राज्यात ठिकठिकाणी तैनात आहे. आपला जीव धोक्यात टाकून ते जनतेचे रक्षण करत आहे. यामुळे घराबाहेर असलेल्या या पोलिसांमध्ये कोरोनाची लागणही झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 55 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 1328 महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) कोरोना बाधित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

'घराबाहेर पडू नका, स्वत:ची काळजी घ्या' असे नागरिकांना आवाहन करणारे पोलीस मात्र याच नागरिकांसाठी आपले घरदार सोडून गेल्या 2 महिन्यांपासून रस्त्यावर उतरले आहेत. देशसेवा, जनसेवा हा एकच ध्यास लागलेल्या या पोलिसांची कामावर असलेली निष्ठा पाहून अख्खा देश त्यांची स्तुती करत आहे. मात्र घराबाहेर पडलेल्या या पोलिसांचे जीव मात्र आता धोक्यात येत आहे. दिवसेंदिवस पोलिसांमध्ये वाढत जाणारा कोरोनाचा फैलाव लक्षात घेता स्थिती गंभीर बनत चालली आहे. नाशिक: मालेगाव मधील पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस स्टेशनमध्येचं झाडली स्वत:वर गोळी; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

महाराष्ट्रात सद्य परिस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार 58 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 249 अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 हजार 437 जण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून कोविड19 च्या रुग्णांची संख्या 21152 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येने 1,00,000 चा टप्पा पार केला असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1,01,139 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात 4970 नवे रुग्ण आढळले असून 134 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

लॉकडाऊनचा कालावधीत वाढत आहे. त्यामुळे राज्य किंवा देशातील विविध भागातून पुण्यात शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी अडकून पडले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांनी "आहात तिथेच थांबा आणि सहकार्य करा," असे आवाहन केले आहे. यासाठी पुणे पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देण्यात आला आहे.