Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 522 नवीन कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 8590 वर
एकीकडे लॉक डाऊन (Lockdown) संपण्याचा, 3 मेचा कालावधी संपत येत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रा (Maharashtra) मधील कोरोना बाधितांच्या (Coronavirus) संख्येत अपेक्षित घट होत नसल्याचे दिसत आहे
एकीकडे लॉक डाऊन (Lockdown) संपण्याचा, 3 मेचा कालावधी संपत येत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रा (Maharashtra) मधील कोरोना बाधितांच्या (Coronavirus) संख्येत अपेक्षित घट होत नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात आज 522 नवीन कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत व राज्यात 27 मृत्यूची नोंद झाली आहे. अशा प्रकारे राज्यात एकूण कोरोना व्हायरस पॉझिटिव्हची संख्या 8590 वर पोहोचली आहे. आज एकूण 94 रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. आजच्या आकड्यांसह एकूण मृतांचा आकडा 369 झाला आहे.
एएनआय ट्वीट -
यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत उपचारानंतर 1282 रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे आढळली आहे. आज बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या धारावी भागात कोरोना व्हायरसच्या 13 नवीन घटना समोर आल्या असून, आतापर्यंत 148 मृत्यूंसह धरावी मधील एकूण रुग्णांची संख्या 288 झाली आहे.
मुंबईत आज 395 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण व 15 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये एकूण रुग्णांचा आकडा आता 5589 वर पोहोचला आहे. फक्त मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 219 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 118 लोकांना बरे झाल्यानंतर घरी सोडले. आतापर्यंत शहरात एकूण 1015 रुग्ण बरे झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार कोरोना रुग्ण आढळले आहेत. इथल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 89 वर पोहोचली आहे. तसेच पुणे महानगरपालिकाचा परिसर कन्टेंटमेट झोन म्हणून 3 मे पर्यंत कायम राहणार असल्याचे, पुण्याचे सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी जाहिर केले.
आज केंद्रीय आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत एकही नवा कोरोना विषाणूचा रूग्ण आढळला नाही. या यादीमध्ये आता महाराष्ट्रातील गोंदिया, कर्नाटकातील देवनगेरे आणि बिहारमधील लाखी सराईचा समावेश झाला आहे. (हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सदस्यत्वाबाबत राज्यपालांना पुन्हा विनंती)
भारताबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत 1463 नवीन प्रकरणे आणि 60 मृत्यूची नोंद झाली. भारतामध्ये चोवीस तासांतील हा मृतांचा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. भारतातील एकूण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28,380 झाली आहे.