COVID19 Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; राज्यात दिवसभरात 5134 रुग्णांची नोंद, 224 मृत्यू

महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 5 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 2 लाख 17 हजार 121 वर पोहचली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 5 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 2 लाख 17 हजार 121 वर पोहचली आहे. यापैकी 9 हजार 250 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 18 हजार 558 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 7 लाख 19 हजार 665 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 20 हजार 160 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाख 39 हजार 948 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- COVID19 Cases In Dharavi: मुंबई येथील धारावी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; दिवसभरात आढळला केवळ एकच रुग्ण!

एएनआयचे ट्वीट-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स व बीकेसी या ठिकाणी मिळून उभारण्यात आलेल्या विविध कोरोना आरोग्य केंद्रातील एकूण 3 हजार 520 रुग्णशय्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करण्यात आले. हे बेड्स कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement