Money Laundering Case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कडून Nawab Malik यांच्याविरोधात 5000 पानांचे आरोपपत्र दाखल
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात विशेष पीएमएलए न्यायालयात सुमारे 5000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात विशेष पीएमएलए न्यायालयात सुमारे 5000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी अटक झाल्यानंतरही त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही.
न्यायालयात दोषारोपपत्र घेऊन जात असतानाचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये पोलीस कर्मचारी चार्जशीट मोठ्या पेटीत घेऊन जाताना दिसत आहेत. विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिकच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना घरी बनवलेले अन्न आणि औषधे घेण्यास परवानगी दिली आहे. (हेही वाचा - मंत्री Dhananjay Munde यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक; न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी)
Mumbai | Enforcement Directorate submits around 5000-page chargesheet against NCP leader and Maharashtra minister Nawab Malik in Special PMLA court, in connection with a money laundering case pic.twitter.com/E1nFoqY5xf
— ANI (@ANI) April 21, 2022
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फरारी गुंड दाऊद इब्राहिमच्या साथीदारांचा समावेश असलेल्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या संबंधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. अटकेनंतर, मलिक यांनी आपली अटक आणि त्यानंतर ईडीने दिलेली कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली होती.
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 08:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

