Unauthorized Shools in Pune: धक्कादायक! पुण्यात 50 अनधिकृत शाळा, शिक्षण विभागाचा पालकांना सावधतेचा इशारा; यादी पहा

तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश न घेण्याचे आवाहनही केले आहे.

Photo Credit- Pixabay

Unauthorized Shools in Pune: शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख. मात्र, पुण्यातील शाळांसंदर्भात (Education Department) एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात ५० अनधिकृत शाळा असल्याच(Unauthorized Shools in Pune) समजतयं. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना पाल्याचा प्रवेश घेताना सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहून मुलांना अनधिकृत शाळेत पाठवू नका, असे आवाहन केले आहे. (हेही वाचा:Ghodbunder Road Rage: बेस्ट बस आणि ट्रक यांच्या चालकांमध्ये वाद, खासगी वाहनाचे आरसे फोडले (Watch Video) )

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश न घेण्याचे आवाहनही केले आहे.

पुणे शहरातील अनधिकृत शाळांची यादी

पुणे शहरात दि गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल, इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल,द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल, मेरीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, शिव समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, दारूल मदिनाह स्कूल, नारायणा इ टेक्नो स्कूल, लेगसी हायस्कूल, इमॅन्युअल पब्लिक स्कूल, सी. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल, टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲँड मक्तब या अनधिकृत शाळा आहेत.

मावळ तालुक्यात जीझस क्राईस्ट इंग्लिश मीडियम, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल, व्यंकेश्‍वरा वर्ल्ड स्कूल, किंग्ज वे पब्लिक स्कूल तर दौंड तालुक्यात किडजी स्कूल, अभंग शिशू विकास, यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल तर हवेली तालुक्यात रामदास सिटी स्कूल, श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर आणि प्राथमिक विद्यालय खेड तालुक्यामध्ये भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल या शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलंय.

मुळशीमध्ये रुडिमेंट इंटरनॅशनल स्कूल, एंजल इंग्लिश स्कूल, चाणक्य ज्युनिअर कॉलेज, इलाईट इंटरनॅशनल स्कूल, वीविद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल, महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल,अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, संस्कार प्रायमरी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, एल.प्रो इंटरनॅशनल स्कूल, माउंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, सरस्वती विद्या मंदिर तर पुरंदरमधील श्रीनाथ इंग्लिश मीडियम अनधिकृत शाळा आहे.