Mumbai Marathi Population: मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये 50 टक्के घरं मराठी माणसासाठी आरक्षित असावे; शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदाराची मागणी

त्यासाठी शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये 50 टक्के घरं मराठी माणसासाठी आरक्षित असावीत, अशी मागणी ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब (Anil Parab) यांनी केली.

Anil Parab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईतील मराठी माणसांची लोकसंख्या  (Marathi Population) झपाट्याने कमी होत आहे हे चिंताजनक असून यासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यानी एक मागणी केली आहे.  मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे. त्यासाठी शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये 50 टक्के घरं मराठी माणसासाठी आरक्षित असावीत, अशी मागणी ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब (Anil Parab) यांनी केली.  मुंबईत मराठी लोकांची (Marathi Manoos) लोकसंख्या कमी होत आहे. त्यामुळे तातडीने कायदा करण्याची गरज अनिल परब यांनी व्यक्त केली. (हेही वाचा - Mumbai Traffic Update: मुंबई सेंट्रल परिसरातील Bellasis Bridge आजपासून 18 महिने बंद!)

मुंबईत मराठी माणसांसाठी परवडणाऱ्या दरात घर बांधण्याची मागणी राज्य सरकार या अधिवेशनात पूर्ण करेल, अशी अपेक्षा असल्याचे अनिल परब यांनी म्हटले. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री शिंदे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला. आचार संहिता सुरु असताना धोरणात्मक चर्चा होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवा जी बैठक घेतली त्यामध्ये काही अधिकारी आणि शिक्षण संचालक होते.

मुंबईतील मराठी माणसांची लोकसंख्या झपाट्याने कमी होत असल्याची चिंता यावेळी त्यानी व्यक्त केली. यावेळी अनिल परब यांनी आगामी विधानपरिषद निवडणुकीसंदर्भातही भाष्य केले. प्रत्येकजण निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून लढत असतो. यासंदर्भात आम्ही महाविकास आघाडीवरून एकत्रित निर्णय घेऊ. निवडणुकीला स्थगिती संदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत, असे अनिल परब यांनी म्हटले.