Coronavirus Update: महाराष्ट्रात 2 लाखाहुन अधिक कोरोनाबाधित; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण जाणुन घ्या

महाराष्ट्र कोरोना व्हायरस अपडेटनुसार काल म्हणजेच 4 जुलै रोजी दिवसभरात राज्यात सार्वधिक अशी 7,074 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, याशिवाय 295 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू सुद्धा झाला आहे. यानुसार सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 2 लाखाचा टप्पा पार करून गेली आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्र कोरोना व्हायरस अपडेटनुसार काल म्हणजेच 4  जुलै रोजी दिवसभरात राज्यात 7,074 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तसेच 295 जणांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला. राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 2 लाखाचा टप्पा पार करून गेली आहे. आतापर्यंत 2,00,064 कोरोनाबाधित आढळले असून यापैकी 83295 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. मुंबई मध्ये कोरोनाचा प्रसार अधिक तीव्र आणि वेगाने होत आहे. कालच मुंबईत 1180 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 82814 इतकी झाली आहे. मुंबई सह ठाणे , कल्याण-डोंबिवली, या लगतच्या भागात तर रायगड, पुणे, नाशिक, नागपूर या जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, या सर्व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहण्यासाठी खालील तक्ता तपासून पहा.  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह, प्रकृती स्थिर असल्याची ट्वीटच्या माध्यमातून दिली माहिती

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या अधिक असली तरी तितकाच राज्याचा रिकव्हरी रेट सुद्धा दिलासादायक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 108082 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत राज्यात 8671 जणांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे.(मुंबई: धारावीत आज कोरोनाच्या दोन रुग्णांची भर तर 2 जणांचा बळी, COVID19 चा आकडा 2311 वर पोहचला)

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 83237 4830 53463
ठाणे 45833 1254 17851
पुणे 26956 841 13064
पालघर 7173 122 2900
औरंगाबाद 6271 283 2703
रायगड 5585 106 2686
नाशिक 4933 223 2820
जळगाव 4026 268 2263
सोलापुर 3106 292 1673
नागपुर 1672 15 1292
अकोला 1609 86 1182
सातारा 1274 48 763
धुळे 1233 58 692
कोल्हापुर 895 12 732
रत्नागिरी 699 27 458
जालना 683 24 380
अमरावती 638 30 446
अहमदनगर 508 15 357
सांगली 417 11 247
लातुर 404 22 223
नांदेड 388 14 241
यवतमाळ 329 11 227
बुलढाणा 298 13 167
हिंगोली 288 1 250
उस्मानाबाद 253 12 182
सिंधुदुर्ग 239 5 164
नंदुरबार 197 9 83
गोंदिया 159 2 104
बीड 129 3 95
परभणी 118 4 83
वाशिम 116 3 81
चंद्रपुर 109 0 61
भंडारा 89 0 77
गडचिरोली 72 1 59
वर्धा 17 1 13
अन्य जिल्हे 111 25 0
एकुण 200064 8671 108082

दरम्यान, एकीकडे कोरोना पसरत असताना दोन दिवसांपासून मुंबईसह अन्य सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर सुद्धा वाढला आहे. पावसात अन्य आजार सुद्धा पसरण्याचा धोका प्रबळ होतो त्यामुळे सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि घराबाहेर पडणे टाळावे अशी विनंती आम्हीही आपणास करत आहोत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now