Coronavirus Update: मुंबईतील कोरोनाबाधितांनी 40 हजारांचा टप्पा ओलांडला; दिवसभरात 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद; तर, 40 जणांचा मृत्यू

मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही सकारात्मक बदल दिसून आला नाही. मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही सकारात्मक बदल दिसून आला नाही. मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 40 हजार 877 वर पोहचली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जीवापाड प्रयत्न करत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही कोरोनाबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथील धारावी, माहीम आणि दादर परिसरातील अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Nisarga Cyclone: मच्छिमार्‍यांना 4 जूनपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा; महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर वादळाचे सावट

एएनआयचे ट्वीट- 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद