कोरोना विषाणूबद्दल माहिती: पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 4 जणांना Coronavirus ची लागण; शहरातील बाधितांच्या संख्या 89 वर पोहचली
कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी देशपातळीवर तसंच राज्यपातळीवर देखील विशेष प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे
देशभरात कोरोनाची (Coronavirus) लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी देशपातळीवर तसंच राज्यपातळीवर देखील विशेष प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) परिसरात आढळून आले आहेत. यातच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आणखी 4 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आहेत. यांपैकी 3 रुग्ण एकाच परिसरात राहत असल्याचे समजत आहे. सध्या शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्या 89 पोहचली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी देशपातळीवर तसंच राज्यपातळीवर देखील विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी काही निर्णय घेतले. काही उपाय योजना राबवल्या त्या कामाबद्दल त्यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे. मात्र, पिंपरी-चिडवडमध्ये आणखी 4 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने नागरिक धास्तावून गेले आहेत. दरम्यान, आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या चौघांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे चार ही व्यक्ती 30 वर्षीय वयाच्या आतील आहेत. यामध्ये एक 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील तिघे जण रुपीनगर परिसरातील असून महिला मोशी परिसरातील असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हे देखील वाचा- COVID19: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा हटके उपक्रम; परिचारिकाच्या वेशात केली नायर रुग्णालयात एंट्री (Watch Video)
शहरात करोना बाधितांची संख्येत जरी वाढ होत असली तरी दुसऱ्या बाजूने करोनामुक्त व्यक्तींची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शहरातील आत्तापर्यंत एकूण 28 जण ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आहे. तसेच कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत 4 जणांनी आपला जीव गमवला आहे.