पनवेल: तळोजा येथील शिव कॉर्नर सोसायटीत आढळले 4 मृतदेह
यात पती-पत्नी आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती समजताचं तळोजा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पनवेल (Panvel) शहरातील तळोजा (Taloja) फेज वनमधील सेक्टर 9 येथील शिव कॉर्नर सोसायटीत (Shiv Corner Society) 4 मृतदेह आढळले आहेत. यात पती-पत्नी आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती समजताचं तळोजा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, पतीने-पत्नीसह आपल्या 2 लहान मुलांची हत्या करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केली असावी. गेल्या काही दिवसांपासून हे चार मृतदेह या फ्लॅटमध्ये पडून होते. हे कुटुंब या सोयायटीमध्ये भाडेत्तवावर राहत होते. अद्याप या चौघांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. तळोजा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - जळगाव: आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांकडून 17 वर्षीय मुलीची हत्या)
दरम्यान, गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला होता. उत्तर-पूर्व दिल्लीच्या भजनपुरा भागामधील एका घरात 5 जणांचे कुजलेले मृतदेह सापडले होते. तसेच मागील दोन वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये एका कुटुंबातील 11 सदस्यांनी सामूहित आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. राज्यात तसेच देशात वारंवार सामूहिक आत्महत्येच्या घटना घडतात. शुल्लक कारणावरून संपूर्ण कुटुंब आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे.