Pune Rape Case: पुण्यात 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाला अटक

अटक (Arrest) करण्यात आलेला आरोपी हा मूळचा वाशिममधील मालेगावचा रहिवासी आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

पुण्यात (Pune) 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केल्याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाला स्थानिक न्यायालयाने शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिस कोठडी सुनावली. अटक (Arrest) करण्यात आलेला आरोपी हा मूळचा वाशिममधील मालेगावचा रहिवासी आहे.  याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून तिने घडलेला प्रकार उघड केला. 19 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता हा व्यक्ती त्यांच्या घरी आला आणि तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. शेजारी असल्याच्या ओळखीमुळे ती मुलगी त्याच्यासोबत गेली. तिथे तिच्यावर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने तिला घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.

मात्र, मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.  सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण म्हणाले, तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून तिला आणखी काही दुखापत झाली आहे का ते कळू शकेल. अॅट्रॉसिटी कायद्याची कलमेही लावण्यात आल्याने तपास विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना आरोपीला तिच्या कास्टची माहिती असल्याने पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याची कलमे लावली आहेत. हेही वाचा  Nagpur Acid Attack: नागपुरात महिलेच्या चेहऱ्यावर फेकले अॅसिड, आरोपीला अटक

भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 504, 506 सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 2015 सुधारणा आणि कलम 4, 8, आणि 12 नुसार लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाकण पोलीस स्टेशनच्या म्हाळुंगे चौकीत नोंद करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif