IPL Auction 2025 Live

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे 300 लीटर पाण्यावर डल्ला; अज्ञात पाणीचोरांवर गुन्हा दाखल

त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे तर लागत आहेच. पण आता वणवण भटकून साठवलेले पाण्याचीही राखण करण्याची नवीच जबाबदरी लोकांवर येऊन पडली आहे. त्यातच पाणीचोरट्यांचे प्रमाण वाढते की काय अशी स्थिती आहे.

water | (Photo Credit:- Wikimedia commons)

दुष्काळाच्या आणि पाणीटंचाईच्या झळा उनापेक्षाही किती भयानक असू शकतात याचे प्रत्यंतर नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड ( Manmad) येथून पुढे आले आहे. मनमाड येथील श्रावस्तीनगर परिसरात चक्क पाण्याच्या पाण्याची चोरी झाली आहे. श्रावस्तीनगर परिसरात वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे (Vilas Ahire) यांच्या घरी ही घटना घडली आहे. आहिरे यांनी या प्रकाराबद्दल मनमाड पोलीस स्टेशन (Manmad police station) येथे पाणीचोरीची रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर एकच खळबळ उडाली असून परिसरात चर्चेला ऊत आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, विलास आहिरे हे काही कारणांसाठी परगावी गेले होते. दरम्यान, त्यांच्या घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत त्यांनी पाणी साठवून ठेवले होते. काही काळानंतर आहिरे घरी परत आले. घरातील वास्तव पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या घरावरच्या टाकीतील पाणी चक्क चोरुट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली होती.

सांगितले जात आहे की, नाशिक जिल्हा आणि मनमाड परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे तर लागत आहेच. पण आता वणवण भटकून साठवलेले पाण्याचीही राखण करण्याची नवीच जबाबदरी लोकांवर येऊन पडली आहे. त्यातच पाणीचोरट्यांचे प्रमाण वाढते की काय अशी स्थिती आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र राज्यात धरणांमध्ये अवघा 32% पाणी साठा, औरंगाबाद येथे भीषण पाणी टंचाई)

विलास आहिरे यांनी दिलेली तक्रर पोलिसांनी दप्तरी नोंद केली खरी. पण, आता पाणीटंचाईशी सामना करुन मिळवलेल्या पाण्याचीही सुरक्षा करावी लागणार का? अशी भीती नागरिकांना सतावती आहे. तर दुसऱ्या बाजूला चोरांच्या यादीत आता पाणी चोरांचाही समावेश करायचा का याबाबत पोलीस हैराण आहेत.