ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकाराकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटींचा निधी वितरीत
त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आजच होणार आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत केवळ मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांची मकरसंक्रांत दूर होणार आहे, हो एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे . 300 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आजच होणार आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत केवळ मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे. ग्रॅज्युइटी आणि पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत. तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असुन वेतनासाठी प्रशासनाने ३०० कोटी रुपये वितरीत केले जाणार आहेत. एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हे सकारात्मक पाऊल उचललं आहे. या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर 2022 च्या वेतनासाठी 2022-23 मध्ये गृह (परिवहन) विभागाच्या अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली केलेल्या तरतूदीमधून 300 कोटी रुपये प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर 300 कोटी रुपये हा खर्च 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.
जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारनं मान्य केलं होतं. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार एसटी कर्मचारी नाराज होते. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पण राज्य सरकाराकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटींचा निधी वितरीत करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार होणार आहेत. (हे ही वाचा:- Rapido Bike Taxi Ban: बाइक टॅक्सी सेवा देणाऱ्या 'रॅपिडो'ला Bombay High Court चा मोठा दणका; तत्काळ राज्यातील सेवा बंद करण्याचे आदेश)
एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्याची तातडीने सरकारने दखल घेतली. त्यानंतर 300 कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आजच महामंडळाला देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आजच होणार आहेत. पण दरमहिना 360 कोटी देणे गरजेचे आहे..तशी हमी राज्य सरकारने कोर्टात दिली आहे. मात्र दर महिन्याला सरकारकडून अपुरा निधी दिला जात आहे..त्यामुळे कामगारांची देणी देण्यासाठी थकलेली रक्कम 1 हजार 200 कोटींच्या घरात गेलेली आहे.