Coronavirus In Pune: मुंंबईला मागे टाकत पुणे विभागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, आज शहरात 1658 नव्या रुग्णांंची नोंद, पहा आकडेवारी
महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयाच्या (Maharashtra Health Ministry0 माहितीनुसार पुणे विभागात (COVID 19 Cases In Pune) राज्यातील सर्वाधिक एकुण व अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असल्याचे समजत आहे.
Coronavirus Update: महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयाच्या (Maharashtra Health Ministry0 माहितीनुसार पुणे विभागात (COVID 19 Cases In Pune) राज्यातील सर्वाधिक एकुण व अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असल्याचे समजत आहे. संंपुर्ण पुणे जिल्ह्यात 1 लाख 73 हजार 174 इतके कोरोना रुग्ण आजवर आढळले आहेत. यापैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांंची संंख्या 1 लाख 17 हजार 205 इतकी आहे तर आजवर 4060 जणांंचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तसेच पुणे विभागात कोरोनाचे 51,909 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे मुंबई (Coronavirus In Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,237 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,44,626 वर पोहोचली आहे.
केवळ पुणे शहराची आकडेवारी पाहिल्यास, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांंनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज 1658 नव्या रुग्णांंची नोंंद झाली असुन एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 94, 497 इतकी झाली आहे. यापैकी 76,686 जणांंनी आजवर कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात 15 हजार 544 अॅक्टिव्ह रुग्ण असुन यातील 833 रुग्ण गंभीर असून यातील 507 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 326 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
ANI ट्विट
मुरलीधर मोहोळ ट्विट
दरम्यान, महाराष्ट्रातील एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा हा सध्या 8 लाखाचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. राज्यात आज कोरोनाचेआणखी 16,408 रुग्ण आढळून आले असुन एकुण रुग्णांंची संंख्या 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली आहे.