IPL Auction 2025 Live

Thane: कोकेन आणि एमडी पावडरची विक्री केल्याप्रकरणी 3 नायजेरियन अटकेत

ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके म्हणाले, शनिवारी शहरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तीन नायजेरियन नागरिकांची माहिती आम्हाला मिळाली.

Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

ठाण्यात कोकेन (Cocaine) आणि एमडी पावडरची (MD) विक्री केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (Anti-drug cells) तीन नायजेरियन नागरिकांना अटक (Nigerian arrested) केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 60 ग्रॅम कोकेन आणि 70 ग्रॅम एमडी आणि मोबाईल फोन जप्त केला. नालासोपारा येथील ओबासी यूजीन स्टॅनली, विरार येथील प्रॉस्पर ओव्हकुरो वाचुकू आणि मालाड येथील संडे वोंटेंगे अशी आरोपींची नावे आहेत. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके म्हणाले, शनिवारी शहरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तीन नायजेरियन नागरिकांची माहिती आम्हाला मिळाली.

टीम तयार करण्यात आली आणि कोरम मॉलजवळील वागळे इस्टेट येथे सापळा रचण्यात आला, ते म्हणाले, आम्ही त्यांना ताब्यात घेतले आणि तपासले. त्यांच्याकडून कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आले. नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर नाताळ दिवशी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर नाईट ब्लॉक

चौकशीदरम्यान त्यांनी हे ड्रग्ज दक्षिण आफ्रिकेच्या व्यक्तीकडून आणल्याचे उघड झाले. तो त्यांच्या सहाय्यकांपैकी एक आहे. आम्ही पासपोर्टची पडताळणी करत आहोत आणि संबंधित विभागाकडून इमिग्रेशनचा तपशील मागवत आहोत, घोडके म्हणाले. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नवीन वर्षात ड्रग पार्ट्यांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.