Thane Opens Fire While Cleaning Gun: बंदूक साफ करताना चुकून झालेल्या गोळीबारात 3 जण जखमी; ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील घटना

त्यानंतर झालेल्या गोळीबारात बिपिन जैस्वाल (21) आणि राहुल जैस्वाल (23, दोघे रा. रुपादेवी पाडा, वागळे इस्टेट) हे दोघे जखमी झाले.

Gun Shot | Photo Credit - Pixabay

Thane Opens Fire While Cleaning Gun: ठाण्यातून (Thane) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंदूक (Gun) साफ करताना एका व्यक्तीकडून चुकून गोळीबार (Firing) झाल्याने तीन जण जखमी झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी एका 50 वर्षीय फॅब्रिकेटर आणि इतर दोन जण त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरची साफसफाई करत असताना चुकून गोळी लागल्याने ते जखमी झाले.

श्रीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक किरण कबाडी यांनी सांगितले की, मोहम्मद उमर शेख (50) यांच्या मालकीच्या राम नगर वागळे इस्टेटमधील त्यांच्या दुकानात संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. (हेही वाचा -Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: किरकोळ वादातून तरुणाची चाकून भोसकून हत्या, छत्रपती संभाजी नगर येथील घटना)

जवळच्या लोकमान्य नगर येथील रहिवासी असलेल्या शेख यांना शस्त्राच्या आत गोळी असल्याचे लक्षात आले नाही आणि त्यांनी चुकून ट्रिगर दाबला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात बिपिन जैस्वाल (21) आणि राहुल जैस्वाल (23, दोघे रा. रुपादेवी पाडा, वागळे इस्टेट) हे दोघे जखमी झाले. (हेही वाचा - Sharad Mohol Murder CCTV Footage: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचं CCTV फुटेज आलं समोर, पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ)

जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. श्रीनगर पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बंदूक साफ करताना चुकून गोळीबार होण्याची ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे परवानाधारकांनी बंदूक साफ करताना योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.