Accident On Samruddhi Expressway: नाशिकमधील समृद्धी महामार्गावर शनिवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एका 11 वर्षीय मुलासह तिघांचा मृत्यू झाला. वेगवान वाहन दुभाजकाला धडकले आणि महामार्गाच्या पलीकडे पडले. ही घटना पहाटे दीडच्या सुमारास घडली. धरमसिंग बुशिगे (51), राजेंद्र राजपूत (49) आणि रगविंद्र (11) अशी मृतांची नावे आहेत. मुलाच्या आई-वडिलांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर त्याचा 15 वर्षीय भाऊ रुग्णालयात उपचार घेत आहे.
हे कुटुंब XUV मध्ये जालन्याला जात होते, वावी पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत मुलाचे वडील कार चालवत होते. प्राथमिक तपासात रॅश आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याचे समोर आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. (हेही वाचा - Nagpur Class 10Th Student: नागपूरात दोन विद्यार्थिनींनी नैराश्यातून आयुष्य संपवलं, दहावीत 71 टक्के गुण मिळूनही विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल)
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारानंतर वाचलेल्यांचे जबाब आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
तपासाचा भाग असलेल्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, महामार्ग लोकांसाठी खुला झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत.