COVID-19 Cases in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरीसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण?

सद्य घडीला राज्यात 1 लाख 80 हजार 718 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल दिवसभरात 11 हजार 607 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 5 लाख 43 हजार 170 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या अपडेट्सनुसार, काल (28 ऑगस्ट) दिवसभरात राज्यात 14,361 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले असून 331 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 लाख 47 हजार 995 इतकी झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 23 हजार 775 वर पोहोचला आहे. सद्य घडीला राज्यात 1 लाख 80 हजार 718 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल दिवसभरात 11 हजार 607 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 5 लाख 43 हजार 170 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.62 टक्के झाले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 39 लाख 32 हजार 522 नमुन्यांपैकी 7 लाख 47 हजार 995 नमुने पॉझिटिव्ह (19.02 टक्के) आले आहेत. राज्यात 13 लाख 01 हजार 346 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 34 हजार 908 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. COVID-19 Update in Dharavi: धारावीत आज दिवसभरात आढळले 5 नवे कोरोनाचे रुग्ण- BMC

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (28 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 3903 274 14869 19046
अकोला 640 151 2938 3730
अमरावती 1006 120 3696 4822
औरंगाबाद 5802 653 15769 22224
बीड 1626 112 2758 4496
भंडारा 281 21 593 895
बुलढाणा 987 72 2081 3140
चंद्रपूर 767 15 1008 1790
धुळे 2039 204 5084 7329
गडचिरोली 126 1 570 697
गोंदिया 492 15 787 1294
हिंगोली 242 34 1112 1388
जळगाव 7174 817 17220 25211
जालना 1373 128 2612 4113
कोल्हापूर 5792 584 13943 20319
लातूर 2805 255 4321 7381
मुंबई 19407 7565 114818 142108
नागपूर 10902 639 13239 24783
नांदेड 3010 197 3068 6275
नंदुरबार 1017 68 1209 2294
नाशिक 10020 842 25481 36343
उस्मानाबाद 2000 147 3368 5515
इतर राज्ये 641 70 0 711
पालघर 6598 567 17530 24695
परभणी 1283 74 1049 2406
पुणे 47519 3974 114099 165592
रायगड 5750 754 22173 28679
रत्नागिरी 1459 133 2200 3792
सांगली 4505 380 6367 11252
सातारा 4765 322 7119 12208
सिंधुदुर्ग 448 20 603 1071
सोलापूर 4398 744 13240 18383
ठाणे 20348 3709 104627 128685
वर्धा 287 16 459 763
वाशिम 304 27 1269 1601
यवतमाळ 1002 71 1891 2964
एकूण 180718 23775 543170 747995

राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात असून कोरोना बाधितांची (COVID-19 Positive) एकूण संख्या 1,42,099 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 7562 वर पोहोचला आहे. मुंबईत सद्य घडीला 19,401 रुग्णांवर उपचार सुरु आहे. मागील 24 तासांत मुंबईत 1241 नवे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,14,818 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या पाहता रिकव्हरी रेट 0.81% इतका झाला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81% इतका झाला आहे. त्याचबरोबर मुंबईत आतापर्यंत 7,43,885 कोविड चाचण्या झाल्या असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now