Coronavirus Update: महाराष्ट्र पोलीस दलात 24 तासात 138 नवे कोरोना रुग्ण, 3 मृत्यू; पहा एकूण आकडेवारी
यानुसार पोलीस दलातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8,722 वर पोहचली आहे.
Coronavirus Update In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील 138 कर्मचाऱ्यांना मागील 24 तासात कोरोनाची लागण झाली असल्याचे समजत आहे. यानुसार पोलीस दलातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8,722 वर पोहचली आहे. याशिवाय कालच्या दिवसभरात कोरोनाशी लढताना महाराष्ट्र पोलिसातील 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, ज्यानुसार आतापर्यंतच्या कोरोना मृतांची संख्या 97 वर पोहचली आहे. सद्य घडीला पोलीस दलात 1,955 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत, आतापर्यंत 6,670 पोलिसांनी या जीवघेण्या विषाणूंवर यशस्वी मात केली आहे. Coronavirus Update: मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली सह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या
दुसरीकडे महाराष्ट्रात, कालच्या दिवसभरात तब्बल 7 हजार 924 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 83 हजार 723 वर पोहचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 592 रुग्ण ऍक्टिव्ह (COVID19 Active Cases) आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या माहितीनुसार, काल राज्यात एकूण 8706 रुग्ण कोरोनमुक्त झाले यानुसार आतापर्यंत 2 लाख 21 हजार 944 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ANI ट्विट
दरम्यान, देशभरात अजूनही महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोनाबाधित राष्ट्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सुद्धा आज 47,704 ने वाढली आहे. कोरोना बाधितांचा एकूण आकडा 14,83,157 वर पोहचला आहे.