Coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1487 वर पोहोचली
त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 487 झाली आहे. यातील 937 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या औरंगाबादमध्ये 481 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) आज सकाळी 28 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 487 झाली आहे. यातील 937 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या औरंगाबादमध्ये 481 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Coronavirus: यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची 124 वर पोहोचली)
आज सापडलेल्या रुग्णांमध्ये जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (1), शिवाजी नगर (1), उस्मानपुरा (4), रेहमानिया कॉलनी (1), रोशन गेट परिसर (2), नारेगाव परिसर (1), न्याय नगर (1), सुराणा नगर (2), नारळी बाग (2), शिवशंकर कॉलनी (2), हमालवाडी (1), न्यु वस्ती जुनाबाजार (1), भवानी नगर, जुना मोंढा (5), या भागातील रुग्णांचा समावेश आहे. (हेही वाचा - Vande Bharat Mission: वंदेभारत अभियानाअंतर्गत 26 फ्लाईट्सच्या माध्यमातून 3 हजार 459 नागरिक महाराष्ट्रात)
मराठवाड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यात मुंबई-पुण्याहून आलेल्या रुग्णांचा जास्त समावेश आहे. मराठवाड्यात शुक्रवारी 89 नवे रुग्ण आढळून आले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात शुक्रवारी एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तसेच उस्मानाबादमध्ये 2 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली.