बीड: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर 27 वर्षीय तरुणाने तलवारीने केला जीवघेणा हल्ला, तरुणी गंभीर जखमी
तिच्यावर हल्ला करणा-या इसमाचे नाव पोपट बोबडे असे आहे. तो 27 वर्षांचा आहे. पीडित मुलगी आपल्याशी का बोलत नाही या कारणावरून या इसमाने तिच्यावर तलवारीने वार केला.
बीडमध्ये (Beed) एकतर्फी प्रेमातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, बीड शहराजवळच्या रामनगर येथे शुक्रवारी ही घटना घडली आहे. तिच्यावर हल्ला करणा-या इसमाचे नाव पोपट बोबडे असे आहे. तो 27 वर्षांचा आहे. पीडित मुलगी आपल्याशी का बोलत नाही या कारणावरून या इसमाने तिच्यावर तलवारीने वार केला.
बीड शहराजवळच्या रामनगर भागात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय पोपट बोबडे याच्या सोबत 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची ओळख होती. मागच्या वर्षभरापासून ती त्या तरुणासोबत काही वेळा बोलत होती. मागील काही दिवसांपूर्वी ही मुलगी तिच्या आजीकडे गेली होती. मात्र मागच्या दहा दिवसांपूर्वी तिच्या आईची तब्येत बिघडल्याने ती पुन्हा बीडमध्ये आपल्या राहत्या घरी आली. त्यानंतर काल (शुक्रवारी) ती घरात एकटी असल्याची संधी साधत ती तोंड धुण्यासाठी घराबाहेर आली असता पोपट बोबडेने पाठीमागून येऊन तिच्यावर अचानक तलवारीने वार केला.हेदेखील वाचा- Vasai: धक्कादायक! मुलाची होती अपेक्षा पण झाली मुलगीच; जन्मदात्या आईनेच घेतला चिमुकलीचा जीव
तिच्या प्रसंगावधानामुळे तिने हा वार हातावर झेलला आणि ती खाली कोसळली. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोपटला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात ग्रामीण ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान सातारा (Satara) जिल्ह्यात जवानाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे जवानाच्या पत्नीने भावजय आणि मेहूण्याच्या मदतीने आपल्या पतीचा काटा काढला आहे. संदीप जयसिंग पवार असं या सैनिकाचं नाव होतं. आरोपी पत्नीने पत्नीने अज्ञाताच्या मारहाणीनंतर संदीप यांचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी संदीप यांची पत्नी, भावजय आणि मेहूण्याला अटक केली आहे.