Newly Married Woman Died At Prabalgad Fort: सेल्फीचा मोह पडला महागात! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू
दुपारी 2.30 च्या सुमारास, गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर शुभांगीने घाटाच्या काठावर उभी राहून सेल्फी काढण्यास सुरुवात केली. सेल्फी काढण्याच्या नादात शुभांगीचा तोल गेला आणि ती खोल दरीत पडली.
Newly Married Woman Died At Prabalgad Fort: पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील 24 वर्षीय नवविवाहित महिलेचा गुरुवारी दुपारी सेल्फी (Selfie) काढताना प्रबळगड किल्ल्यावरून (Prabalgad Fort) सुमारे 200 फूट दरीत घसरून मृत्यू झाला. पनवेल तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शुभांगी पटेल असे मृत महिलेचे नाव असून ती पुण्यातील दत्तवाडी येथील रहिवासी आहे. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी माहिती दिली की, शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल यांचा विवाह 8 डिसेंबर रोजी झाला होता.
नवविवाहित दाम्पत्य बुधवारी हनिमूनसाठी लोणावळ्याहून निघाले आणि गुरुवारी सकाळी ते माची प्रबळगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. दुपारी 2.30 च्या सुमारास, गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर शुभांगीने घाटाच्या काठावर उभी राहून सेल्फी काढण्यास सुरुवात केली. सेल्फी काढण्याच्या नादात शुभांगीचा तोल गेला आणि ती खोल दरीत पडली. (हेही वाचा - Kolhapur Crime: कोल्हापूरात शाररिक संबंधास नकार दिल्याने संतापून विधवा महिलेचा खून, मृतदेह ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, आरोपीला अटक)
दरम्यान, विनायक यांनी तत्काळ पनवेल तालुका पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. गडावरील काही ट्रेकर्स आणि निसर्ग मित्र या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या बचाव पथकातील सदस्यांनी शुभांगीला वर काढले. यावेळी शुभांगीला शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. तिला तातडीने पनवेलला नेण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा - (हेही वाचा- मुंबईतील धक्कादायक प्रकार! चुकून अंगावर शिंकला, संतापून अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं)
पाटील यांनी असेही सांगितले की, शुभांगीचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे. ज्यांना कोणत्याही गैरप्रकाराचा संशय नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितलं.