IPL Auction 2025 Live

Coronavirus In Mahrashtra: महाराष्ट्रातील मुंंबई, पुणे सहित सर्व जिल्हे व शहरांंची कोरोनाबाधितांंची आकडेवारी पाहा

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घ्या..

Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात 18,390 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून एकुण कोरोनाबाधितांंची संख्या 12,42,770 इतकी झाली आहे. यापैकी,9,36,554 जणांंनी आजवर कोरोनावर मात केली आहे, यातील तब्बल 20,206 रुग्ण तर कालच्या दिवसात डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. एकीकडे हा आकडा जितका दिलासादायक आहे तितकाच मृतांंचा आकडा भीतीजनक आहे. महाराष्ट्रात कालच्या दिवसातील 392 रुग्ण मोजुन आजवर 33,407 कोरोना बळी गेले आहेत, सद्य घडीला राज्यात कोरोनाचे 2,72,410 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. Coronavirus In Pune: सशस्त्र दलातील कोविड रुग्णांसोबतच सामान्य पुणेकरांवर Army Institute of Cardio Thoracic Sciences मध्ये कोरोनाचे उपचार; रुग्ण बरे होण्याचा दर 81 %

महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कोरोना वाढीचा रेट हा पुन्हा वाढला आहे, ऑगस्ट महिन्यात 1000 व त्या हुन कमी रुग्णांंची वाढ होत असताना मागील काही दिवस मात्र रुग्णवाढ दरदिवशी 1500-2000 च्या वर होतेय, मुंंबई सहितच पुणे, कोकण, ठाणे, विदर्भ पट्ट्यात सुद्धा कोरोनाबाधित वाढत आहेत, याच पार्श्वभुमीवर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घ्या..

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी (23 सप्टेंबर)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
Ahmednagar 8054 597 28032 36683
Akola 2319 199 4009 6528
Amravati 2667 231 8522 11420
Aurangabad 8955 846 23413 33214
Beed 3061 246 5569 8876
Bhandara 2096 79 2085 4260
Buldhana 1872 107 4565 6544
Chandrapur 4402 75 3622 8099
Dhule 1370 324 10106 11802
Gadchiroli 356 11 1258 1625
Gondia 1956 54 3006 5016
Hingoli 576 52 2001 2629
Jalgaon 8795 1162 34263 44220
Jalna 1846 180 4806 6832
Kolhapur 8435 1133 30017 39585
Latur 3729 442 11047 15218
Mumbai 26764 8555 152204 187904
Nagpur 19141 1769 46043 66959
Nanded 6687 359 6907 13953
Nandurbar 1108 113 3598 4819
Nashik 14005 1166 50830 66001
Osmanabad 2977 299 7384 10660
Palghar 6003 784 27644 34431
Parbhani 1369 156 3321 4846
Pune 59774 5368 201876 267019
Raigad 8188 1032 37876 47098
Ratnagiri 2869 236 4657 7762
Sangli 10557 984 21364 32905
Satara 8992 759 21648 31401
Sindhudurg 1326 57 1820 3203
Solapur 7494 1073 23799 32367
Thane 28894 4585 140141 173621
Wardha 1119 36 2007 3163
Washim 826 68 2679 3574
Yavatmal 3020 150 4007 7177
Other states/country 808 120 428 1356
Total 272410 33407 936554 1242770

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 75.36% झाले आहे. तर मृत्यु दर हा 2.69% इतका आहे. आतापर्यंत राज्यात 60 लाखाहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 12,42,770 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.