Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात मुंबईत नंतर कोणत्या जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वधिक रुग्ण; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून त्यापाठोपाठ ठाणे, पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोविड-19 चे जाळे अधिकाधिक तीव्र होत असताना दिवसागणिक मृतांच्या संख्येत देखील वाढ होत चालली आहे. गेल्या काल (22 जून) दिवसभरात 3721 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दिवसभरात 62 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1962 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 135796 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 67706 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 6283 रुग्ण दगावले असून सद्य स्थितीत 61,793 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून त्यापाठोपाठ ठाणे, पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. Coronavirus Update In India: देशात 24 तासांत 14,933 COVID19 रुग्णांची वाढ, 312 मृत्यू; एकूण कोरोना बाधितांचा आकडा 4,40,215 वर, पहा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी ( 22 जून रात्री 10 पर्यंत)

 

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 66488 3671 33491
ठाणे 24388 716 9575
पुणे 15881 601 8622
पालघर 3453 90 1047
औरंगाबाद  3400 174 1880
नाशिक 2762 152 1526
रायगड 2530 91 1541
जळगाव 2258 182 1187
नागपुर 1325 13 833
अकोला 1188 63 757
सातारा 840 38 584
सोलापुर 741 8 670
कोल्हापुर 741 8 670
रत्नागिरी 501 17 334
धुळे 500 46 329
अमरावती 441 22 278
जालना 365 11 231
सांगली 293 7 160
नांदेड 282 11 175
अहमदनगर 280 12 209
हिंगोली 252 1 214
यवतमाळ 233 7 161
लातुर 217 12 139
उस्मानाबाद  176 6 130
सिंधुदुर्ग 163 4 126
बुलडाणा 160 6 104
गोंदिया 101 0 69
बीड 93 3 65
परभणी 85 4 74
नंदुरबार 83 5 36
भंडारा 75 0 49
वाशिम 71 3 17
गडचिरोली 59 1 46
चंद्रपुर  58 0 44
वर्धा 14 1 11
अन्य जिल्हे 114 20 0
एकुण 130611 6006 65384

तर भारतात मागील 24 तासात देशात एकुण 14933 नवे कोरोना रुग्ण वाढले असुन दुर्दैवाने 312 जणांचा मृत्यु झाला आहे. देशात आजवर एकुण 4 लाख 40 हजार 215 कोरोना बाधित आढळले असुन यापैकी सद्य घडीला 1 लाख 78 हजार 14 जण हे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 2 लाख 48 हजार 190 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना मृतांचा आकडा सध्या 14011 वर पोहचला आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now