Zomato Delivery Boy Dies After Speeding BEST Bus Hits: बेस्ट बसची दुचाकीला धडक; 22 वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, चालकाला अटक
ऑर्डर देण्यासाठी निघालेला सौरभ रस्त्यावर पडला आणि बेस्ट बसच्या चाकाखाली आला. ही घटना मरोळ मेट्रो स्टेशनजवळ घडली.
Zomato Delivery Boy Dies After Speeding BEST Bus Hits: बेस्ट बसने ( BEST Bus) धडक दिल्याने आतापर्यंत अनेक दुचाकीस्वरांना तसेच पादचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना बुधवारी मुंबईतील (Mumbai) मरोळ (Marol) येथे घडली. बेस्ट बसने ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे (Online Food Delivery) काम करणाऱ्या 22 वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) च्या दुचाकीला धडक दिली. यात डिलिव्हरी बॉय मृत्यू झाला. सौरभ आयरे (वय, 22) असे या तरुणाचे नाव आहे.
सौरभ चार महिन्यांपासून झोमॅटोसोबत ऑनलाईन फूड डिलिव्हरीचं काम करत होता. दरम्यान, सहार पोलिसांनी बेस्ट बस चालक रुपेश दहिवडे याला घटनास्थळावरून अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 304 (अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा - Viral Video: ऑर्डर एक तास उशिरा पोहोचल्यानंतर, ग्राहकाने Zomato Delivery Boy चं असं केलं 'स्वागत'; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ, पहा)
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस कुर्ल्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून दुचाकीला धडक दिली. ऑर्डर देण्यासाठी निघालेला सौरभ रस्त्यावर पडला आणि बेस्ट बसच्या चाकाखाली आला. ही घटना मरोळ मेट्रो स्टेशनजवळ घडली. (हेही वाचा - Zomato चा डिलेव्हरी बॉय त्याच्या मुलांना घेऊन फूड ऑर्डर्स देत असल्याचा व्हिडिओ वायरल; सोशल मीडीयात नेटकर्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया (Watch Video))
सौरभचा भाऊ अक्षयने सांगितले की, सौरभला ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपवर नोकरी लागल्यानंतर कुटुंबाने त्याच्यासाठी दुचाकी खरेदी केली होती. बुधवारी संध्याकाळी, मला माझ्या भावाच्या फोनवरून अपघाताची माहिती देणारा फोन आला. मी मरोळ नाक्यावर गेलो. तिथे लोकांनी मला सांगितले की, माझ्या भावाला सेव्हनहिल्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तथापी, रुग्णालयातील डॉक्टरांनी सौरभला मृत घोषित केले.