Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स

पाहूया महाराष्ट्रातील COVID-19 रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी (22 मे)

Coronavirus (Photo Credit: Twitter)

देशात कोरोना संक्रमितांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत असून महाराष्ट्र (Maharashtra) जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात काल दिवसभरात 2,345 नव्या रुग्णांची भर पडली असून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 41,642 इतकी झाली आहे. यात 1,454 रुग्णांचा मृत्यू झाला असून 11,726 रुग्ण बरे झाले आहेत. ही संख्या पाहता राज्यात कोरोना विषाणू जलद गतीने आपले जाळे पसरत आहे असेच दिसत आहे. देशात याहून भयाण परिस्थिती आहे. भारतात एकूण 1,12,359 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 3,435 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पुण्यामध्ये (Pune) 5371 रुग्ण आढळले असून नाशिक (Nashik) जिल्ह्यात एकूण 1425 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पाहूया महाराष्ट्रातील COVID-19 रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी (22 मे)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 25,500 882
2 ठाणे 338 4
3 ठाणे मनपा 2048 33
4 नवी मुंबई मनपा 1668 33
5 कल्याण डोंबिवली मनपा 641 6
6 उल्हासनगर मनपा 131 3
7 भिवंडी निजामपूर मनपा 80 3
8 मीरा भाईंदर 362 4
9 पालघर 102 3
10 वसई विरार मनपा 425 11
11 रायगड 285 5
12 पनवेल मनपा 271 11
ठाणे मंडळ एकूण 31,851 996
1 नाशिक 113 0
2 नाशिक मनपा 84 2
3 मालेगाव मनपा 710 43
4 अहमदनगर 47 5
5 अहमदनगर मनपा 19 0
6 धुळे 15 3
7 धुळे मनपा 80 6
8 जळगाव 252 29
9 जळगाव मनपा 79 4
10 नंदुरबार 26 2
नाशिक मंडळ एकूण 1425 94
1 पुणे 255 5
2 पुणे मनपा 4207 222
3 पिंपरी-चिंचवड मनपा 203 7
4 सोलापूर 10 1
5 सोलापूर मनपा 512 27
6 सातारा 184 2
पुणे मंडळ एकूण 5371 264
1 कोल्हापूर 141 1
2 कोल्हापूर मनपा 20 0
3 सांगली 54 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 9 1
5 सिंधुदुर्ग 10 0
6 रत्नागिरी 123 3
कोल्हापूर मंडळ एकूण 357 5
1 औरंगाबाद 20 0
2 औरंगाबाद मनपा 1106 39
3 जालना 43 0
4 हिंगोली 110 0
5 परभणी 15 1
6 परभणी मनपा 3 0
औरंगाबाद मंडळ एकूण 1297 40
1 लातूर 51 2
2 लातूर मनपा 3 0
3 उस्मानाबाद 19 0
5 बीड 13 0
6 नांदेड 11 0
7 नांदेड मनपा 81 4
लातूर मंडळ एकूण 178 6
1 अकोला 29 2
2 अकोला मनपा 315 15
3 अमरावती 9 2
4 अमवरावती मनपा 131 12
5 यवतमाळ 111 0
6 बुलढाणा 38 3
7 वाशीम 8 0
अकोला मंडळ एकूण 641 34
1 नागपूर 3 0
2 नागपूर मनपा 434 6
3 वर्धा 3 1
4 भंडारा 9 0
5 गोंदिया 3 0
6 चंद्रपूर 8 0
7 चंद्रपूर मनपा 7 0
8 गडचिरोली 7 0
नागपूर मंडळ एकूण 474 7
1 इतर राज्य 48 11
एकूण 41,642 1454

दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.