मुंबईमधील Apple च्या रिटेल स्टोअरजवळ Google, LG, Sony सारखे प्रतिस्पर्धी 22 ब्रँड्स आपले दुकान उघडू शकणार नाहीत, पहा यादी

या यादीवरून दिसून येत आहे की, अॅपल भारतात आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

Apple (Apple / Twitter)

आयफोन बनवणारी कंपनी अॅपल (Apple) या महिन्याच्या अखेरीस मुंबईत आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याची शक्यता आहे. देशातील हे पहिले स्टोअर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये सुरू होत आहे. आता या दुकानाच्या लॉन्चच्या आधी काही बातम्या समोर आले आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की अॅपलचे सीईओ टिम कुक देखील या लॉन्चच्या दिवशी येऊ शकतात. याशिवाय आणखी एक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये अॅपलच्या कराराबद्दल सांगितले आहे.

माहितीनुसार, करारानुसार, जगभरातील लोकप्रिय 22 ब्रँड अॅपलच्या स्टोअरजवळ दुकाने उघडू शकत नाहीत किंवा त्यांच्या जाहिरात करू शकत नाहीत. अॅपलला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना आपल्या स्टोअरपासून दूर ठेवायचे आहे. डेटा अॅनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्स आणि द इकॉनॉमिक टाईम्सनुसार, जे ब्रँड मुंबईतील अॅपल स्टोअरजवळ दुकाने उघडू शकत नाहीत किंवा जाहिरात करू शकत नाहीत त्या ब्रँडची यादी पुढीलप्रमाणे-

Amazon, Facebook, Google, LG, Microsoft, Sony, Twitter, Bose, Dell, Devialet, Foxconn, Garmin, Hitachi, HP, HTC, IBM, Intel, Lenovo, Nest, Panasonic आणि Toshiba.

अहवालात ही 21 नावे हायलाइट केली आहेत, परंतु यातील 22 वे नाव सॅमसंग असण्याची शक्यता आहे. या यादीवरून दिसून येत आहे की, अॅपल भारतात आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. भारत असा देश आहे जिथे अॅपलने गेल्या सहा वर्षांत स्थिर वाढ पाहिली आहे. मुंबईत आपले पहिले रिटेल स्टोअर सुरू केल्यानंतर, अॅपल दिल्लीतील साकेत येथील सिटीवॉक मॉलमध्ये दुसरे स्टोअर उघडणार आहे. सध्या अॅपलचे 25 देशांमध्ये 500 पेक्षा जास्त रिटेल स्टोअर्स आहेत. (हेही वाचा: Apple's First India Retail Store: ऍपल कंपनी मुंबईच्या BKC भागात उघडणार आपले भारतामधील पहिले रिटेल स्टोअर, जाणून घ्या सविस्तर)

रिपोर्टनुसार, अॅपलने जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलसोबत 11 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी करार केला आहे. याअंतर्गत कंपनी दरमहा 42 लाख रुपये भाडे देणार आहे. याशिवाय, करारानुसार अॅपल दर तीन वर्षांनी 15 टक्के भाडे वाढवणार आहे.