Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत महिलांच्या तुलनेत पुरुषांचा टक्का अधिक; पहा लेटेस्ट आकडेवारी

अहवालात मांडल्या प्रमाणे सध्या राज्यात 38 टक्के महिला कोरोनाबाधित आहेत तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 62 टक्के इतके आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा 124331 वर पोहचला असून आजवर 5893 जणांचा बळी गेला आहे. तसेच 62773 जणांची प्रकृती सुधारली असून 55651 जणांवर अद्याप उपचार सुरु असल्याचे समजत आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाकडून दर दिवशी राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर आधारित सविस्तर मेडिकल रिपोर्ट शेअर केला जातो. या अहवालाच्या माहितीनुसार सद्य घडीला महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण 24 टक्के जास्त असल्याचे समजत आहे. अहवालात मांडल्या प्रमाणे सध्या राज्यात 38 टक्के महिला कोरोनाबाधित आहेत तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 62 टक्के इतके आहे. ही टक्केवारी संख्येत सांगायची झाल्यास 124331 पैकी 47 हजार 336 महिला रुग्ण आहेत तर 76 हजार 952 पुरुष कोरोनाबाधित आहेत. आजवर यापैकी 35टक्के म्हणजेच 1583 महिलांचा मृत्यू झाला आहे तर 65 टक्के म्हणजेच 2901 पुरुषांचा कोरोनाने बळी घेतला आहे. Coronavirus In Pune: पुण्यात मागील 24 तासांत सर्वाधिक 823 कोरोनाबाधित रूग्ण; एकूण रूग्ण संख्या 15, 004 पार!

दुसरीकडे याच अहवालात कोरोनाबाधित रुग्णांच्या वयोगटानुसार आकडेवारी सुद्धा मांडलेली आहे. ज्यानुसार राज्यात 31 ते 40 या वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण (19 . 85%) आहे तर यापरवी सर्वाधिक धोक्याचा मानला गेलेला 60 हुन अधिक वयाच्या गटात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसून येत आहे. Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, औरंगाबादसह 'या' महत्वाच्या जिल्ह्यांमधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची आकडेवारी एका क्लिकवर येथे पहा

कोरोनाबाधित रुग्णांचा लिंगानुसार अहवाल

Coronavirus Update (Photo Credits: Maharashtra Health Ministry)

दरम्यान, देशात आज कोरोनाबाधितांची संख्या 4  लाखाच्या पार गेली आहे. मागील 24 तासात यामध्ये 15413 रुग्णांची मोठी भर पडली आहे. तर 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4,10,461 वर पोहचली आहे. त्यापैकी 169451 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 227756 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात एकूण 13254 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे