IPL Auction 2025 Live

Coronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (20 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Coronavirus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 20,598 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 12 लाखांच्या पार गेली असून हा आकडा 12,08,642 (Coronavirus Cases) इतका झाला आहे. त्याचबरोबर काल (20 सप्टेंबर) दिवसभरात 450 रुग्ण दगावले असून मृतांचा आकडा हा 32,671 (Coronavirus Death Cases) वर गेला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात दर दिवसा कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येपेक्षा दिवसागणिक बरे होणा-या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मागील 24 तासांत राज्यात 26,408 बरे झाले आहेत. याचाच अर्थ हा आकडा वाढणा-या रुग्णसंख्येपेक्षा 6 हजारांहून अधिक आहे. यामुळे राज्यात कोरोनावर मात करणा-या रुग्णांची संख्या 8,84,341 (COVID-19 Recovered Cases) इतकी झाली आहे.

राज्यात सद्य घडीला 2,91,238 रुग्णांवर (COVID-19 Active Cases) उपचार सुरु आहेत. राज्यात बरे होणा-या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे रिकव्हरी रेट 73.17% इतका झाला आहे. तर मृत्यूदर 2.7% इतका झाला आहे. Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,236 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,84,313 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (20 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)  

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 9268 569 25839 35676
अकोला 2152 199 3971 6323
अमरावती 2322 217 8104 10643
औरंगाबाद 8546 834 23087 32467
बीड 3047 234 5312 8593
भंडारा 2110 74 1836 4020
बुलढाणा 2071 105 4258 6434
चंद्रपूर 3996 68 3399 7463
धुळे 1524 309 9795 11630
गडचिरोली 367 8 1163 1538
गोंदिया 1794 50 2693 4537
हिंगोली 563 50 1876 2489
जळगाव 8975 1127 32779 42881
जालना 1922 178 4586 6686
कोल्हापूर 8132 1104 28272 37508
लातूर 3988 427 10253 14668
मुंबई 27787 8469 147807 184439
नागपूर 19100 1676 43460 64241
नांदेड 6704 342 6474 13520
नंदुरबार 1190 111 3371 4672
नाशिक 13900 1145 48127 63172
उस्मानाबाद 2913 283 7133 10329
इतर राज्ये 728 114 428 1270
पालघर 6298 772 26799 33869
परभणी 1557 151 2986 4694
पुणे 74768 5264 181103 261135
रायगड 9658 1010 35554 46224
रत्नागिरी 2862 223 4428 7513
सांगली 10767 946 19878 31591
सातारा 9048 737 20250 30037
सिंधुदुर्ग 1325 57 1656 3038
सोलापूर 7531 1044 22879 31455
ठाणे 29654 4529 136485 170669
वर्धा 941 32 1914 2888
वाशिम 811 64 2523 3399
यवतमाळ 2919 149 3863 6931
एकूण 291238 32671 884341 1208642

महाराष्ट्रात पुणे आणि मुंंबई या दोन शहरात जणु काही कोरोना रुग्णवाढीची स्पर्धाच लागली आहे, काल मुंंबईत पुन्हा 2,236 रुग्णांची नोंद झाली असुन एकूण संक्रमितांची संख्या 1,84,313 वर पोहचली आहे. तर पुण्यात सुद्धा 1700 नव रुग्णांंसह 1,31,781 इतकी एकूण कोरोनाबाधितांंची संख्या झाली आहे.

तर भारतात कोरोना संक्रमितांची एकूण 54 लाखांच्या पार गेला असून हा आकडा 54,00,620 वर पोहोचला आहे. तर मृतांची एकूण संख्या 86,752 इतकी झाली आहे. देशात सद्य घडीला 10 लाख 10 हजार 824 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर देशात आतापर्यंत 43 लाख 03 हजार 044 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.