Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत 'या' वयोगटातील रुग्णांचे प्रमाण अधिक, पहा संपुर्ण आकडेवारी

दुसरीकडे 60 ते 80 या वयोगटात मात्र अपेक्षेहून कमी रुग्णसंख्या आहे. ही आकडेवारी सविस्तर जाणून घ्या.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 124331 वर पोहचला असून एकूण 5893 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर 55651 रुग्णांवर उपचार सुरु असून 62773 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजून ही मुंबई सह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, ठाणे या जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. महाराष्ट्र सरकार तर्फे दररोज या रुग्णांच्या आकडेवारी सह वैद्यकीय अहवाल मांडला जातो. यातील ताज्या अपडेटनुसार, आठवड्याभरातील कोरोना रुग्णांची वयोगटानुसार आकडेवारी समोर आली आहे. तुमच्या जिल्ह्यात कोविड-19 चे किती रुग्ण? जाणून घ्या एका क्लिकवर

प्राप्त माहितीनुसार, 31 ते 40 या वयोगटात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झाल्याचे समजत आहे. दुसरीकडे 60 ते 80 या वयोगटात मात्र अपेक्षेहून कमी रुग्णसंख्या आहे. ही आकडेवारी सविस्तर जाणून घ्या.(भारतामध्ये 24 तासांत सर्वाधिक 14516 नवे रूग्ण तर 375 जणांचा मृत्यू; COVID-19 बाधितांची संख्या 395048 वर)

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वयोगटानुसार आकडेवारी

क्र. वय वर्ष  कोरोना रुग्णसंंख्या टक्केवारी
1 0-10 4203 3.50
2 11-20 वर्ष 7792 6.48
3 21-30 वर्ष 22827 18.98
4 31-40 वर्ष 23887 19.87
5 41-50 वर्ष 21742 18.08
6 51-60 वर्ष 20747 17.25
7 61-70 वर्ष 12469 10.37
8 71-80 वर्ष 5042 4.19
9 81-90 वर्ष 1388 1.15
10 91-100 वर्ष 143 0.12
11 101-110 वर्ष 1 0.00
एकुण 120241 100.00

दरम्यान आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी अशी की मुंबईतील कोविड19 चा डबलिंग रेट 29 दिवसांवर पोहचला आहे. याबाबत कोविड टास्क फोर्स मेंबर्स डॉ. शंशांक जोशी यांनी माहिती दिली आहे. रुग्णांच्या संख्येचा डबलिंग रेट जास्त झाल्यामुळे रुग्णांसाठी लागणाऱ्या अतिरिक्त बेड्सची संख्या सुद्धा कमी झाल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले होते.