IPL Auction 2025 Live

Coronavirus: पुण्यात आज दिवसभरात 202 नवे कोरोनाबाधित रुग्ण

यात खासगी रुग्णालयात 99, नायडू-महापालिका रुग्णालयात 96 आणि ससून रुग्णालयात 7 रुग्णांचा समावेश आहे. पुणे शहरात आतापर्यंत एकूण 3 हजार 295 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 202 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. यात खासगी रुग्णालयात 99, नायडू-महापालिका रुग्णालयात 96 आणि ससून रुग्णालयात 7 रुग्णांचा समावेश आहे. पुणे शहरात आतापर्यंत एकूण 3 हजार 295 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, पुण्यात आज 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात 197 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत पुण्यात 1 हजार 205 स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत पुण्यात 30 हजार 224 स्वॅब टेस्ट पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय आज दिवसभरात 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत  एकूण 1698 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये नायडू-पुणे महापालिका 57, खासगी रुग्णालये 09 आणि ससूनमधील 02 रुग्णांचा समावेश आहे.  (हेही वाचा - Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये आज 1606 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद, राज्यातील संक्रमितांची संख्या 30,706; मुंबईतील रुग्णांची संख्या 18,396 वर)

पुण्यातील म्हाळुंगे येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलात 1 हजार बेडस् तयार करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे महापालिकेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्या आहेत. आज मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्ष आयसोलेशन सेंटरला भेट देऊन पाहणी केली. भविष्यात गरज लागली तर आलेल्या परिस्थितीला सामना करण्यासाठी या सेंटरची उभारण्यात करण्यात आली आहे. परंतु, याची गरज लागू नये, असं अपेक्षा मोहोळ यांनी व्यक्त केली.