Coronavirus: पुण्यात आज दिवसभरात 201 कोरोना संक्रमित रुग्णांची भर तर 53 रुग्ण कोरोनामुक्त
यात नायडू-महापालिका रुग्णालयातील 174, खासगी 18 आणि ससून रुग्णालयातील 9 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या 201 रुग्णांसह पुणे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 496 इतकी झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
Coronavirus: पुण्यात (Pune) आज दिवसभरात 201 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. यात नायडू-महापालिका रुग्णालयातील 174, खासगी 18 आणि ससून रुग्णालयातील 9 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या 201 रुग्णांसह पुणे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 496 इतकी झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
पुणे शहरात कोरोनावर उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. पुणे शहर एकूण 3 हजार 496 कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 751 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 1 हजार 551 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - मुंबईमध्ये कोरोनाचा हाहाकार! आज दिवसभरात 1571 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 38 जणांचा मृत्यू; शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 967 वर पोहोचली)
दरम्यान, आज दिवसभरात पुण्यात 53 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात कोरोना रुग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत 1751 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नायडू-पुणे महापालिका रुग्णालयातील 39, खासगी रुग्णालयातील 13 आणि ससूनमधील 01 रुग्णांचा समावेश आहे