Accident On Nalanda Bridge of EEH: घाटकोपर पूर्वेकडील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नालंदा पुलावर दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये 2 तरुणांना मृत्यू
यात चिन्मय शिंदे (24) हा मोटारसायकलस्वार मुंबईहून ठाण्याकडे जात असताना त्याचा अपघातात मृत्यू झाला.
Accident On Nalanda Bridge of EEH: घाटकोपर पूर्वेकडील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील (Eastern Express Highway) नालंदा पुलावर (Nalanda Bridge) रविवारी पहाटे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. पहिली घटना पहाटे 4.40 ते 4.55 च्या दरम्यान घडली. यात चिन्मय शिंदे (24) हा मोटारसायकलस्वार मुंबईहून ठाण्याकडे जात असताना त्याचा अपघातात मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवत असताना दुसऱ्या मोटारसायकलवर आदळला आणि रस्त्याच्या कडेला घसरून गंभीर जखमी झाला. तो दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे त्याचा तोल गेला. शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य व्यक्ती, मोहिनुद्दीन कुरेशी (31) हा जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. कुरेशी हे ग्रँट रोड येथे राहत होते. (हेही वाचा - Posters of Mughal Emperor Aurangzeb: औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्या चौघांवर FIR दाखल, अशा घटना खपवून न घेण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा इशारा)
शिंदे यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिंदे हा टागोर नगर, विक्रोळी येथील रहिवासी होता. पहिल्या अपघातानंतर अवघ्या तासाभरात दुसरी घटना घडली. अपघातात मृत शिंदे यांचा पाय शरीरापासून वेगळा होऊन रस्त्यावर पडलेला होता. तसेच त्याच्या पोटात आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, लालबाग-परळ उड्डाणपुलावर रविवारी झालेल्या अपघातात तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा ती तिच्या पालकांसोबत मोटरसायकलवरून जात होती. तिघांना भायखळा येथील मसिना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी रियांशीला मृत घोषित केले.