Nandurbar Accident: नंदुरबार-डोंगरगाव रस्त्यावर कार अपघात, शहादा तालुक्यातील युवक ठार

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

Accident (PC - File Photo)

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डोंगरगाव रस्त्यावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या कारच्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारचा संपुर्णत: चक्काचूर झाला आहे. या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. त्यानंतर एका झाडाला जाऊन जोरदार धडकली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. हे दोघे शहादा तालुक्यातील रहिवासी आहेत. या दोघांच्या मृत्यू मुळे गावावर शोककळा पसरली आहे.  (हेही वाचा - Punjab Shocker: चार कोटी रुपयांच्या विम्यासाठी मित्राची हत्या, स्वत:च्या मृत्यूचाही रचला बनाव; रामदास नगर येथील घटना)

घटनास्थळ आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अमरसिंग धनसिंग गिरासे आणि विजय श्रावण सोनवणे हे दोघे युवक कारने डोंगरगावकडून शहाद्याकडे निघाले होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने तीन पलटी घेतल्या तसेच रस्त्याच्या विरुद्ध दिशेला झाडाला जबरदस्त ठोकर मारली. यामध्ये अमरसिंग (दराने रोहाने हल्ले मुक्काम लोणखेडा) व विजय याचा मृत्यू झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif