Coronavirus Cases In Dharavi: धारावीत आज 2 जणांचा मृत्यू तर 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1984 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

Coronavirus Cases In Dharavi: धारावीत (Dharavi) आज 2 जणांचा कोनामुळे मृत्यू झाला असून 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1984 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

धारावीत दररोज नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धारावीत लोक दाट वस्तीच्या भागात राहतात. त्यामुळे तेथे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण एकट्या मुंबई शहरात सापडत आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे या भागात दररोज नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. (हेही वाचा - Fire at Mumbai's Crawford Market: मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग; अग्निशमनदलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल)

दरम्यान, बुधवारी मुंबईत 1 हजार 567 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 97 जणांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 52 हजार 445 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 855 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 23,693 जणांनी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. (वाचा - जळगाव: रुग्णालयाच्या शौचालयात आढळला मृतदेह; दोषींवर कडक कारवाई करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा)

याशिवाय राज्यात बुधवारी 3254 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 94,041 वर पोहोचला आहे. काल दिवसभरात 149 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 1879 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 44,517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या 46074 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 3438 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif