Malegaon: नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये गेला आणि परतलाच नाही, हृदयविकाराच्या झटक्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्विमिंग पूलमध्ये (Swimming pool) पोहताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Malegaon: नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये गेला आणि परतलाच नाही, हृदयविकाराच्या झटक्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dead

सध्या हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मालेगावमधून (Malegaon) एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये (Swimming pool) पोहताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे वय अवघे 19 वर्ष होते. जयेश भावसार (Jayesh Bhavsar) असे मृताचे कुटुंबीय नाव आहे. या घटनेने भावसा यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शिवाजी नगरमधील अस्पायर क्लबच्या (Aspire Club) स्विमिंग पूलमध्ये जयेश भावसार हा पोहोण्यासाठी आला होता. हेही वाचा Housing Scheme: खुशखबर! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर CIDCO सादर करणार गृहनिर्माण योजना; तब्बल 4,158 घरांची होणार विक्री, जाणून घ्या सविस्तर

पोहत असतानाच त्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो स्विमिंग पुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. हे बघताच तेथील उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्याला बाहेर काढले. त्याला वाचवण्यासाठी त्याचे छाती आणि पोट दाबत वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्व प्रयत्नांना यश आले नाही. त्यानंतर जयेशचा मृत्यू झाला.

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2022 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).