Coronavirus Update: महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोना बाधित बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णसंख्येत वाढ होण्यापेक्षा जास्त; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

तर मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर पोहोचला आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे मागील 24 तासांत रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या प्रमाणापेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना कोरोना व्हायरस हळूहळू आपला विळखा आणखीनच घट्ट करत चालला आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 21,656 नवे रुग्ण आढळले असून 405 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 लाख 67 हजार 496 वर (COVID-19 Positive Cases) पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर (COVID-19 Death Cases) पोहोचला आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे मागील 24 तासांत रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या प्रमाणापेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. काल (18 सप्टेंबर) दिवसभरात राज्यात 22,078 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात एकूण 8 लाख 34 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात (COVID-19 Recovered Cases) केली आहे.

राज्यात सद्य घडीला 3 लाख 887 रुग्णांवर उपचार (COVID-19 Active Cases) सुरु आहेत. सध्या राज्यात 17,78,792 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 36,767 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.72% एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (#RecoveryRate) 71.47% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 56,93,345 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 11,67,496 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

हेदेखील वाचा- Coronavirus Cases In Mumbai: मुंबईत 2267 नव्या रुग्णांसह शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,80,542 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (18 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)  

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 8662 542 24686 33890
अकोला 1864 185 3896 5946
अमरावती 2142 211 7750 10103
औरंगाबाद 7934 799 22669 31402
बीड 2888 224 5145 8257
भंडारा 1827 54 1790 3671
बुलढाणा 2323 103 3691 6117
चंद्रपूर 3856 62 3185 7103
धुळे 1615 287 9530 11434
गडचिरोली 416 3 1035 1454
गोंदिया 1510 48 2529 4087
हिंगोली 466 49 1828 2343
जळगाव 8940 1106 31327 41373
जालना 1830 177 4452 6459
कोल्हापूर 9537 1068 25471 36076
लातूर 4122 404 9517 14043
मुंबई 34259 8375 137664 180668
नागपूर 21746 1586 36772 60109
नांदेड 6272 335 6170 12777
नंदुरबार 1146 109 3195 4450
नाशिक 12582 1124 46944 60650
उस्मानाबाद 2983 261 6715 9959
इतर राज्ये 681 112 428 1221
पालघर 6016 758 26231 33005
परभणी 1463 143 2906 4512
पुणे 79691 5133 168730 253554
रायगड 9591 986 34556 45135
रत्नागिरी 3014 197 3889 7100
सांगली 10404 904 18461 29769
सातारा 8719 697 19100 28518
सिंधुदुर्ग 1297 54 1580 2931
सोलापूर 7146 1022 22022 30191
ठाणे 29921 4449 132611 166982
वर्धा 952 28 1672 2653
वाशिम 730 61 2444 3236
यवतमाळ 2342 135 3841 6318
एकूण 300887 31791 834432 1167496

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 52 लाखांच्या पार गेला आहे. दरम्यान आज मागील 24 तासांमध्ये भारतामध्ये 96,424 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर 1,174 जणांची कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसची लागण झाल्याने कोविड 19 (COVID 19) वर उपचार घेणार्‍यांची संख्या 10,17,754आहे. तर आत्तापर्यंत एकूण 84,372 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरामध्ये एकूण कोरोनाबाधित देशांच्या यादीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे.