NEET Aspirant Dies by Suicide: निकाल लागण्याच्या अगोदरचं नापास होण्याच्या भीतीने भंडाऱ्यातील 18 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
NEET परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने जीव दिल्याची चर्चा आहे. आज नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. परंतु, याआधीच विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे.
NEET Aspirant Dies by Suicide: भंडारा जिल्ह्यातून (Bhandara District) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री तुमसर शहराजवळील हसारा गावात एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केली. नीट परीक्षेत (NEET Exam 2025) नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने जीव दिल्याची चर्चा आहे. आज नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. परंतु, याआधीच विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे.
अमित रमेश बिसने असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. अमित सुमारे दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) देत होता. कुटुंबातील सदस्य आणि स्थानिकांच्या मते, अमित नीट परीक्षेसाठी खूप अभ्यास करत होता. तसेच तो नीट परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होता. (हेही वाचा -NEET (UG) 2025 Results Out: नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in वर जाहीर)
अमित अलीकडे अनेक वेळा त्याला नीट परीक्षेते यश मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त करत होता. त्यामुळे तो मानसिक तणावात गेला होता. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी, निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी, अमित त्याच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे अमितच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक -
टेली मानस (आरोग्य मंत्रालय) – 14416 किंवा 1800 891; निमहंस – 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन – 080-23655557 आयकॉल – 022-25521111आणि 9152987821; पीक माइंड – 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन – 9999 666 555
(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2025 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

