पुणे: 40 लाखांच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करून हत्या; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवरात सापडला मृतदेह
अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवरात सापडला मृतदेह आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल तय्याब सिद्धिकी (वय 17) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी उमर नसीर शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. अब्दुल सिद्धिकी हा भोसरी येथील एका व्यावसायिकाचा मुलगा होता.
पुण्यात 40 लाखांच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना घडली आहे. अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवरात सापडला मृतदेह आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल तय्याब सिद्धिकी (वय 17) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी उमर नसीर शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. अब्दुल सिद्धिकी हा भोसरी येथील एका व्यावसायिकाचा मुलगा होता.
मृत अब्दुलच्या वडिलांचा भोसरी येथे एक छोटासा व्यवसाय आहे. अब्दुल त्याच्या वडिलांना या व्यवसायात मदत करू लागत होता. परंतु, शनिवारी रात्री अब्दुलच्या मित्रांनीच त्याचे अपहरण केले. त्यानंतर अब्दुलच्या मित्रांनी अब्दुलच्या फोनवरुन खंडणीची मागणी केली. या सर्व प्रकारानंतर अब्दुलच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. (हेही वाचा - उत्तर प्रदेश: समाजवादी पार्टीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या; 12 जानेवारी 2020 च्या ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अब्दुलचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर रविवारी पहाटे पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात अब्दुलचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.