Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 24,619 कोरोना रुग्ण वाढले, 398 मृत्यु, पाहा सविस्तर आकडेवारी

महाराष्ट्रात आज कोरोनाचे 24,619 नवे रुग्ण आढळुन आले यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांंची एकुण संंख्या 11,45,840 (Total COVID 19 Cases) च्या घरात पोहचली आहे

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra:  महाराष्ट्रात आज कोरोनाचे 24,619 नवे रुग्ण आढळुन आले यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांंची एकुण संंख्या 11,45,840 (Total COVID 19 Cases) च्या घरात पोहचली आहे. मागील 24 तासात राज्यात कोरोनाने 398 बळी घेतले आहेत परिणामी एकुण कोरोना मृतांंची (Coronavirus Deaths) संंख्या 31,351 इतकी झाली आहे. हे आकडे जितके चिंंताजनक आहेत तितकीच दिलासासायक अशी आजच्या कोरोना रिकव्हर (Corona Recovered) रुग्णांंची आकडेवारी आहे. आज राज्यात 19,522 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ज्यानुसार एकूण रिकव्हरी झालेल्या रुग्णांंची संंख्या 8,12,354 इतकी झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य आरोग्य मंंत्रालयाने माहिती दिलेली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे हॉटस्पॉट असणार्‍या मुंंबई व पुणे शहरात आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. प्राप्त माहितीनुसार मुंंबईत आज नवे 2,389 कोरोनाबाधित नोंदवले गेले असुन, एकूण संक्रमितांची संख्या 1,78,275 वर पोहोचली आहे. दुसरीकडे पुण्यात सुद्धा दिवसभरात नवे 1964 कोरोनाबाधित आढळले असुन एकूण संख्या आता 1,26, 532 इतकी झाली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.90% एवढे झाले आहे. तर आजच्या आकडेवारीसह राज्यातील मृत्यु दर हा 2.74% इतका झाला आहे. राज्यात सध्या 17,70,748 जण घरातच क्वारंटाईन असुन 36,827 जण हॉस्पिटल मध्ये क्वारंटाईन केलेली आहेत.