Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 1602 नविन कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 27,524 वर; मुंबईमध्ये 16579 संक्रमित रुग्ण
आजच्या आकड्यांसह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 27,524 झाली आहे. आज 1602 नविन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत
कोरोना विषाणू (Coronavirus) बाबत महाराष्ट्रातील (Maharashtra) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजच्या आकड्यांसह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 27,524 झाली आहे. आज 1602 नविन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज 512 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात 6059 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 20,441 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले. राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) बद्दल बोलायचे झाले तर, आज मुंबईत 998 नवीन सकारात्मक कोविड-19 प्रकरणे आणि 25 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईमध्ये एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 16579 झाली आहे.
मुंबईमध्ये मृतांचा आकडा 621 वर पोहोचला आहे. आज एकूण 443 लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे आजपर्यंत 4234 रुग्णांना सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 40 हजार 145 नमुन्यांपैकी. 2 लाख 12 हजार 621 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. राजेश टोपे यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात 3 लाख 15 हजार 686 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 15 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात 44 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे एकूण संख्या 1019 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 25, नवी मुंबईत 10, पुण्यात 5, औरंगाबाद शहरात 2, पनवेलमध्ये 1, तर कल्याण डोंबिवलीमध्ये 1 मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 31 पुरुष तर 13 महिला आहेत. (हेही वाचा: BMC: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 33 नवे रुग्ण आढळले; आतापर्यंत 1 हजार 061 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग तर, 42 जणांचा मृत्यू)
राज्यात मुंबई हे कोरोना विषाणू बाबत सर्वात बाधित शहर असून, इथल्या धारावी झोपडपट्टीमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारावीत आज 33 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1,061 वर पोहोचली आहे. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 42 वर पोहचली आहे.